कुणी घर देता का घर? चित्रपटाला हा डायलॉग जसा लोकप्रिय आहे तसा तो घर घेण्याची स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाच्या मनात ही सतत साद घालत असतो यात शंका नाही. फरक इतकाच की सध्या ‘कुणी बजेट मध्ये घर देता का घर?’ असं म्हंटल तर ते जास्त योग्य ठरेल , नाही का?
याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कॅलीक्स ग्रुप घेऊन येत आहे तुमच्यासाठी तुमच्या स्वप्नातलं घर ते ही अगदी तुमच्या बजेट मध्ये! विश्वास बसत नाही? पण हे अगदी खर आहे! कॅलीक्स ग्रुप सादर करीत आहे अतुल्य रघुकुल – १ & २ बीएचके घर जी नटलेली आधुनिक सोयीसुविधा, उत्तम बांधकामाचा दर्जा आणि कॅलीक्स च्या विश्वसनीयतेने!
नुकत्याच पार पडलेल्या अतुल्य रघुकुल लाँच सोहळ्याला पिंपरी चिंचवडवासियांनी व पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला! अतुल्य रघुकुल मधील सॅम्पल फ्लॅट पाहण्याकरिता विशेष प्राधान्य देण्यात आलं आणि सर्वांनी तो आवडला देखील. बजेट घरामध्ये लक्झरी अनुभव देणारा असा हा गृहप्रकल्प आहे अस म्हणल तर ते वावगं ठरणार नाही. या लाँच सोहळ्याला सुप्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी यांनी देखील भेट दिली व कौतुक ही केले. त्यांनी ग्राहकांशी संवाद साधून त्यांना नवीन घरासाठी शुभेच्छाही दिल्या.
१५०० घर असणाऱ्या पिंपरी चिंचवड च्या हद्दीतील सर्वोत्तम गृहप्रकल्प अतुल्य रघुकुल मध्ये तुम्हाला आयुष्याचा एक नवा आनंद आणि सोयी सुविधांच एक नव रूप अनुभवायला मिळेल. हा भव्य प्रकल्प साकार होत आहे पुण्यापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर, दिघी–आळंदी रोड, चऱ्होली येथे!
पिंपरी चिंचवडच्या हद्दीत असणाऱ्या या गृहप्रकल्पाला येत्या काळात एक वेगळेच महत्व प्राप्त होणार आहे आणि याच गोष्टींचा विचार करून आम्ही तुमच्या बजेटमध्ये एक सुंदर आणि परिपूर्ण घर देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तो आपल्या पसंतीस नक्की उतरेल याची आम्हाला खात्री आहे.
आता वाट पाहू नका! हीच ती योग्य वेळ तुमचं स्वप्नातलं घर बुक करण्याची ते ही योग्य आणि परवडणाऱ्या दरात! याचबरोबर तुम्ही पंतप्रधान आवास योजनेचाही लाभ घेऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला मिळेल अधिक फायदा!
आत्तापर्यंत या प्रकल्पात १३०० हून अधिक बुकिंग्स झाले आहेत, तेव्हा त्वरा करा आणि ही सुवर्णसंधी दवडू नका! आजच भेट द्या अतुल्य रघुकुल ला आणि एका नवीन सुरवातीचा श्रीगणेशा करा!