अतुल्य, आपके सपनों का घर
September 23, 2017
अतुल्य, खिशाला परवडणारं स्वप्न
September 23, 2017

नवं घर घ्यायचं म्हंटलं कि सामान्य माणसाला धडकीच भरते. याला कारण सुद्धा तसंच आहे. बांधकाम क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात फसवणूक चालते कि साधारण माणसं दहा वेळा विचार करतात. या सगळ्यामुळे, एक विश्वसनीय गृह योजना ही काळाची गरज बनलेली आहे.

‘कॅलिक्स ग्रुप’ हे पुण्यातल्या बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय आणि नामांकित नाव आहे. कॅलिक्स ग्रुप ने १९९२ साली बांधकाम क्षेत्रात पदार्पण केलं. पण त्याआधी सुद्धा १९४० सालापासून कॅलिक्स ग्रुप बिजनेस क्षेत्रात सक्रिय आहे. ७५ वर्षांपेक्षा जास्त असलेल्या खानदानी परंपरेचा वारसा कॅलिक्स ग्रुपला लाभलेला आहे.

अश्या या विश्वसनीय ग्रुप कडून ‘अतुल्य’ नावाची सुबक गृह योजना लवकरच आपल्या समोर येत आहे. तळेगाव स्थित या गृह योजनेत तुम्हाला तुमच्या स्वप्नातले घरकुल अगदी स्वस्त दरात उपलब्ध होईल. ९.36 ते 13.63 लाख*  या दरम्यान उपलब्ध असलेली घरं तुम्हाला नक्कीच आवडतील.

निसर्गाच्या सानिध्यात, भरपूर मोकळी जागा आणि शुद्ध हवा हे ह्या संकुलाची मोहक वैशिष्ठ्ये आहेत. त्याचबरोबर हे संकुल शहरवस्ती पासून अगदी जवळ स्थित आहे. मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले एरिया, वातानुकूलित क्लब हाऊस, सुरेख भव्यदिव्य लॉबी आणि अश्याच अजून अनेक सुविधांनी सुसज्ज सुमारे ७०० फ्लॅट्सचा हा प्रकल्प आहे.

मजबूत बांधकाम, जागेचा परिपूर्ण वापर आणि सुखसोयींची रेलचेल, हे कॅलिक्स ग्रुपच्या सगळ्याच प्रकल्पाचे विशेष गुण आहेत. अतुल्य मध्ये आम्ही केवळ तुमचाच नाही तर तुमच्या परिवाराचा सुद्धा विचार केलेला आहे. म्हणूनच अगदी लहानांपासून सिनियर सिटिझन्स पर्यंत, सगळ्यांसाठी इथे सुखसोयी आहेत.

तुम्हाला तुमचं मनासारखं घर मिळवून देण्याकरता अतुल्यला साथ लाभली आहे प्रधानमंत्री आवास योजनेची. ही योजना आर्थीकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींना घरे मिळवून देण्यास कार्यरत आहे.

या योजनेअंतर्गत महिला आणि दिव्यांगांना प्राधान्य तर मिळतच, याशिवाय आदिवासी आणि ओबीसी इत्यादींना सुद्धा विशेष लाभ मिळतात. गृहकर्जावर १०% ऐवजी केवळ ६.५% व्याजदर. शिवाय सरकार तर्फे २.६७ लाखाची सब्सिडी सुद्धा मिळते.

पण सर्वात अगोदर, या योजनेच्या काही आवश्यकता पूर्ण करणे भाग आहे. या योजनेसाठी तुमची पात्रता सिद्ध करण्यासाठी तुमच्याजवळ योग्य कागदपत्रे असणं गरजेचं आहे.

याबद्दलची अधील माहिती तुम्हाला प्रधान मंत्री आवास योजनेच्या वेबसाईटवर मिळेल. एकदा का तुम्ही अतुल्य ला भेट दिलीत कि आम्हाला खात्री आहे, तुम्ही प्रेमात पडल्यावाचून राहणार नाही.

तुम्ही आम्हाला एकदा भेटाच. तुमचे स्वप्नातले घर तुम्हाला मिळवून देणे, ही जवाबदारी आमची.

अधिक माहिती साठी आमच्या वेबसाइट http://bit.ly/2xNCoYVवर भेट द्या किंवा कॉल करा 020-67006752 वर.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *